सोमवार, २० एप्रिल, २००९

ललित चोखंदळ वाचक निवडीसाठी वाचक निरुत्साही

‘ललित’ मासिकाकडून मराठी वाचकांच्या अभिरुचीचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या
‘ललित चोखंदळ वाचकांची निवड’ या उपक्रमासाठी वाचकांनीच यंदाच्या वर्षी अत्यल्प प्रतिसाद दिला. मासिकातर्फे विविध क्षेत्रातील पाचशे जणांची निवड करून वाचलेल्या पुस्तकांपैकी आपली आवड कळविण्याचे आवाहन पत्राद्वारे करण्यात आले होते. मात्र त्यापैकी फक्त १७३ जणांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. या वाचक निवडीत मोनिका गजेंद्रगडकर यांच्या ‘आर्त’ या पुस्तकाला सर्वाधिक म्हणजे २४ वाचकांनी आपली पसंती कळवली आहे.
मराठीतील सुजाण आणि चोखंदळ वाचकांना एकमेकांच्या आवडीची कल्पना यावी आणि गेल्या वर्षभरात कोणती चांगली पुस्तके वाचली गेली, त्याची माहिती इतर वाचकांना व्हावी, या उद्देशाने १९६५ पासून म्हणजेच गेल्या ४३ वर्षांपासून चोखंदळ वाचकांची निवड हा उपक्रम ‘ललित’ मासिक राबवत आहे. २००८ या वर्षांत प्रकाशित झालेल्या पुस्तकातून जी पुस्तके वाचली गेली व वाचकांना आवडली, त्याचा शोध घेण्यासाठी बृहन्महाराष्ट्रातील पाचशे जणांना पत्र पाठवून पुस्तके कळविण्याचे आवाहन करण्यात आले होते.
चोखंदळ वाचकांकडून निवड करण्यात आलेली अन्य पुस्तके आणि ती निवड केलेल्या वाचकांची संख्या अशी - मॅजेस्टिक कोठावळे (१७), गंगा आए कहॉसे-मूळ लेखक-गुलजार, अनुवाद-विजय पाडळकर (१७), पाणीयावरी मकरी-प्रा. राम शेवाळकर (१६), त्या वर्षी- शांता गोखले (१३) मनश्री-सुमेध वडावाला-रिसबूड (१३), वारी-एक आनंदयात्रा-संदेश भंडारे (११), शांताराम पारितोषिक कथा (९), पुन्हा मर्ढेकर, संपादन-डॉ. विजया राजाध्यक्ष (९), गाथा इराणी-मीना प्रभू (११), सर्वोत्तम सरवटे-संपादन-अवधूत परळकर (९), रुजवात-डॉ. अशोक रा. केळकर, (९), कॉल आफ द सीज्-चंद्रमोहन कुलकर्णी(७), अल्पसंख्य-विजय पाडळकर (७), भारतीय भाषांतील स्त्री साहित्याचा मागोवा, खंड १ व २- संपादिका-डॉ. मंदा खांडगे व डॉ. निलीमा गुंडी, डॉ. विद्या देवधर व डॉ. निशिकांत मिरजकर, (७), खुंदळघास-सदानंद देशमुख (८) आदी पुस्तकांचाही समावेश आहे.

४ टिप्पण्या:

  1. अच्छी ब्लॉग हे / मराठी और हिन्दी मे टाइप करने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल का इस्तीमाल करते हे..?
    रीसेंट्ली, मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लॅंग्वेज टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा ता तो मूज़े मिला " क्विलपॅड " /
    आप भी "क्विलपॅड" www.quillpad.in यूज़ करते हे क्या...?

    उत्तर द्याहटवा
  2. नमस्कार
    मी युनीकोडमध्ये टाईप करतो. तसेच आमचा लोकसत्ताची मराठी फॉण्ड मी घऱी कॉम्प्युटरवर टाकून घेतला आहे. तसेच कीबोर्ड doe आहे.
    आपण ब्लॉग वाचून आवर्जून प्रतिक्रिया कळवल्याबद्दल आभार
    शेखर जोशी

    उत्तर द्याहटवा
  3. namaskaar Shekhar. I read your post almost regularly. But how to type my comment in Marathi font here? Please guide me.
    Mangesh Nabar

    उत्तर द्याहटवा
  4. मंगेश नाबर
    नमस्कार
    तुमच्या कॉम्प्युटरमध्ये रिजनल लॅग्वेज ऑप्शनला जाऊन मराठी/हिंदी भाषा आहे की नाही ते पाहा. नसेल तर कॉम्प्युटर इंजिनिअरकडून विंडो़ज सर्वीस पॅक-२ टाकून घ्या. ते केले की तुम्हाला मराठी फॉण्ट निवडून मराठी टायपिंग करता येऊ शकेल.

    उत्तर द्याहटवा